जनता विद्यालय अभोणा येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. यावेळी डांग सेवा मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, सुभाषचंद्र बोस, उमाजी नाईक या महान विभूतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री बागुल वाय. सी., श्री बागुल आर.एम. यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व प्रतिपादन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांचे अध्यक्षीय मनोगत झाले. यावेळी श्री जाधव डी व्ही, श्री आहिरे आर.एस.सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
