जनता विद्यालय अभोणा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
अभोणा, ता. 28- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्क्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भदाणे एस ई यांनी केले. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी डॉ. सी व्ही रमण, मेरी क्यूरी, कल्पना चावला, सुनीता विल्यम, आनंदीबाई जोशी, यांच्या भूमिका साकार केल्या. व काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिक्षक मनोगतात श्री शिंदे डी ए, श्रीमती कीर्ती गावित, श्रीमती मयुरी आहिरे, यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही., पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका खैरनार यांनी केले तर आभार श्रीमती वर्षा गांगुर्डे यांनी मानले.
