About

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
जनता  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा
    डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा  शाळेची स्थापना जुलै १९६२ रोजी झाली. या विद्यालयात आज ५ वी ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यात ५ वी ते १० वी पर्यंत माध्यमिक विभाग असून १२१९  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत  व ११ वी १२ वी कनिष्ठ महाविद्यालय विभाग सुरु आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आहेत. यात जवळ जवळ ४८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे  यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. कुडाच्या झोपडीत सुरु झालेली शाळ आज सर्व सुविधांनी युक्त अशा भव्य इमारतीत रुपांतरीत झालेली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य क्रीडांगण आहे. विद्यार्थ्यांची व शिक्षकांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी ग्रंथालय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी व अध्यापन करण्यासाठी संगणक कक्ष आहे. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती व्हावी, त्यांना वेगवेगळे प्रयोग करता यावेत यासाठी अटल टिकरिंग लॅब व सुसज्ज प्रयोगशाळा आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.
    याचबरोबर विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, पुस्तक वाचनावर आधारित परीक्षा, पुस्तक परिचय स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, विद्यार्थिनींसाठी श्रावण क्वीन स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा, इ. स्पर्धा व कार्यक्रम घेतले जातात. विद्यालयाचे विद्यार्थी अनेक क्रीडा प्रकारात नैपुण्य दाखवतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी मूल्य रुजवण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून वर्षभरात होत असते. विद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी नोकरी, व्यवसाय, उद्योग – धंदे यात गुंतलेले आहेत.
आपले व्हिजन आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांना स्पर्धेच्या युगात स्पर्धा करण्यास प्रोत्साहन देणे व तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करण्यास प्रवृत्त करणे. सामाजिक संपर्काच्या साधनाचा योग्य पद्धतीने वापर करण्यास शिकवणे.
आपले मिशन विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षण देणे. विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण देणे. विद्यार्थ्यांना कृतियुक्त व दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी होईल असे व्यवहार ज्ञान देणे. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवातून अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत सामावून घेणे. विद्यार्थ्यांच्या मनात सांकृतिक मूल्य रुजवणे.
ध्येय व उद्दिष्टे
  • विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे.
  • आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व जागृती करणे
  • विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
  • विद्यार्थ्यांना जीवन विकासाचे व उच्च दर्जाचे शिक्षण देणे.
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
  • विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी प्रोत्साहन देणे. 
  • विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे.