News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे अंतराराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जनता विद्यालय अभोणा येथे अंतराराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
अभोणा, ता. 8- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. यावेळी सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अभोणा, येथील सर्व महिला शिक्षिका तसेच पोषण आहार विभागातील सर्व महिला यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कुमारी अश्विनी जगताप, चंचल सोनवणे, तनुष्का बोरसे या नववीच्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिक्षक मनोगतात श्रीमती जाधव पी के, श्रीमती गायकवाड बी एस, श्री योगेश बागुल, श्री खुरकुटे जी. एन., श्रीमती स्मिता भदाणे, श्रीमती प्रियंका खैरनार, श्रीमती कीर्ती गावित यांनी महिला दिनाचे महत्त्व प्रतिपादन केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगतातून श्री बोवा एस एस यांनी कर्तृत्त्ववान महिलांचा परिचय करून दिला. तसेच प्रत्येकाने महिलांचा सन्मान केला पाहिजे असा संदेश दिला. यावेळी पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती मयुरी अहिरे यांनी केले.