जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आभोना येथे नशामुक्त अभियान अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले
अभोणा, ता. 06- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे नशामुक्त अभियान व अमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत अभोणा पोलिस स्टेशनचे पी एस आय मा. विजय चौरे सर यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. यावेळी त्यांनी अमली पदार्थ व नशाजन्य पदार्थ किती घातक असतात त्यापासून दूर राहावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी मार्गदर्शन केले. नंतर अमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याकर्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
