News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे विज्ञान छंद मंडळाची स्थापना

जनता विद्यालय अभोणा येथे विज्ञान छंद मंडळाची स्थापना
अभोणा, डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भदाणे एस ई यांनी केले. यावेळी कु. सार्थक मोरे, योगिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विज्ञान गीत, विज्ञान शब्दकोडे घेण्यात आले. त्यानंतर उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही व श्रीमती गांगुर्डे एस एस यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, श्रीमती भदाणे एस ई, श्री मोराणकर सी एल, श्री शिंदे डी ए, श्रीमती जाधव पी.के., श्रीमती खैरनार पी पी, श्रीमती गरुड एस के, श्रीमती ब्राह्मणकर जे आर, श्री कोल्हे डी ए, श्रीमती बागुल एस के श्री महाले एस वाय इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पंकजा इंगळे हिने केले तर आभार श्रीमती गांगुर्डे व्हि एस यांनी मानले.