News Cover Image

जनता विद्यालय अभोणा  येथे भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन

जनता विद्यालय अभोणा  येथे भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन
अभोणा- दि. ७- गायत्री परिवार युग निर्माण ट्रस्ट नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसांठी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण १०३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यात ९७६ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. यावेळी गायत्री परिवारा कडून मा. श्री एम एम सोनवणे, श्रीमती माधुरी सोनवणे, श्रीमती निर्मला अंबाळकर, श्री भारती रोकडे हे उपस्थित होते. या परीक्षेच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.