जनता विद्यालय अभोणा येथे शालेय मंत्रिमंडळ ची स्थापना करण्यात आली
अभोणा, दिनांक, ७-डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना लोकशाहीची माहिती व्हावी यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी, प्रचार व त्यानंतर मतदान घेण्यात आले. यावेळी मतदान बूथ रचनेनुसार कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. यात केंद्र अध्यक्ष, अधिकारी नंबर 1,2,3, शिपाई, पोलिस इत्यादी सर्व कर्मचारी नियुक्त करण्यात आले. वर्गानुसार मतदारयादी करण्यात आली होती त्यानुसार मतदान घेण्यात आले. मुख्यमंत्री पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते, त्यांना नंबर देण्यात आला होता. त्यानुसार मतदारांना मतदारानी नंबर लिहून मतदान केले व मतपेटीत पावती टाकली. आज मतमोजणी करण्यात आली. त्यात शुभांगी शरद गांगुर्डे इयत्ता १० वी ब ची विद्यार्थिनी ७५ मतांनी विजयी होऊन सन २०२६-२७ ची शाळेची मुख्यमंत्री झाली. तर उपमुख्यमंत्री प्रणव सुनील खैरनार १० वी झाला. यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. मतदान प्रक्रियेद्वारे मुख्यमंत्री निवडल्यामुळे विद्यार्थ्यांना मतदानाची प्रक्रिया कशी होते ते कळाले. यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्री बागुल आर एम, श्री देसाई पी. ए., श्री बागुल वाय सी, श्री सोनवणे जे के. यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
