जनता विद्यालय अभोणा येथे पालक - शिक्षक सहविचार सभा संपन्न
अभोणा, ता. 30- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे पालक - शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस. एस. होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेश हिरे, श्रीमती मीराताई पवार, श्री संजय रौंदळ, श्री राकेश दुसाने, श्री हरिकाका सोनजे, श्री सुनील खैरनार, श्री रवींद्र आहेरराव, श्री कृष्णकुमार कामळस्कर, श्री संजय पाटील हे होते. या वेळी सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व पालक यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस यांनी केले. त्यानंतर पालकांनी काही सूचना मांडल्या व शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. त्यानंतर श्रीमती जाधव पी के, श्रीमती गायकवाड बी. एस., श्रीमती खैरनार पी पी, श्री शेवाळे एस एस, यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अध्यक्षीय भाषणातुन मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी दिले. पालकांच्या सुचनांचे नक्कीच पालन होईल असे आश्वासन दिले. आपले सहकार्य आम्हाला असणे गरजेचे आहे हेही पालकांना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन श्री परेश देसाई यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
