News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे गुरुपौर्णिमा साजरी

जनता विद्यालय अभोणा येथे गुरुपौर्णिमा साजरी

अभोणा, ता. 29- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे आपल्या गुरुप्रति ऋण व्यक्त करण्याच्या उद्देशाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्येची देवता सरस्वती, कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. यावेळी पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.