जनता विद्यालय अभोणा येथे स्वतंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी व हिंद दि चादर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे स्वतंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची पुण्यतिथी व हिंद दि चादर कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस हे प्रमुख उपस्थित होते. या वेळी स्वतंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर हिंद दी चादर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना युट्युब च्या साहाय्याने गुरु तेग बहादूर यांचे गीत ऐकवण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
