News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जनता विद्यालय अभोणा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत,संविधान गायन करण्यात आले. नंतर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहन श्रीमती किर्ती गावित यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी स्काऊट गाईड प्रार्थना व गीत गायन करण्यात आले. त्यानंतर असाक्षर मुक्त गाव शपथ घेण्यात आली. नंतर संचलनाने प्रमुख मान्यवरांना सलामी देण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय कवयात सादरीकरण केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, पालक, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आहिरे आर एस यांनी केले.