News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व प्रभातफेरी काढण्यात आली.

जनता विद्यालय अभोणा येथे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व प्रभातफेरी काढण्यात आली.
अभोणा, ता. 24- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कुल अभोणा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षदिंडी व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी वारकऱ्याच्या वेशात आले होते.  हातात वृक्षाची रोपे, पालखी, टाळ व हरीनामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी अभोणा शहरात दिंडी काढण्यात आली. यावेळी  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही., पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. श्री शेवाळे एस एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.