News Cover Image

डांग सेवा मंडळ संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

डांग सेवा मंडळ संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 23- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचा 89 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी थोर स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी सेवक, नाशिक भूषण, दलित मित्र, कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी कर्मवीर दादासाहेब बिडकर व संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी दादासाहेबांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.