News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे स्वछतागृह भूमिपूजन सोहळा संपन्न

जनता विद्यालय अभोणा येथे स्वछतागृह भूमिपूजन सोहळा संपन्न
अभोणा,ता. 23- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे भारतीय रोटरी क्लब व रोटरी क्लब ऑफ कळवण यांच्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी स्वछता गृह बांधून देण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आज विद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ऑस्ट्रेलियाहुन आलेले टॉयलेट वॉरियर्स  श्री मार्क बल्ला, श्रीमती मॅन बल्ला, श्री ईव्हान जोन्स, श्रीमती कॅरन जोन्स तसेच रोटरी क्लब ऑफ नासिकरोड चे रोटेरियन हेमंत शिधावे(अध्यक्ष), विकास दिघे(सचिव), कुणाल शर्मा, श्रीमती विभा पाटील, श्री गणेश वर्मा, श्री सौमित्री दास, फिरदोस कापडिया, महेश थुबे, महेश साळवे, विक्रांत किवांदे, रोटरी क्लब ऑफ कळवणचे विलास शिरोरे, गणेश पाखरे, प्राध्यापक रवींद्र पगार, राजेश मुसळे, रवींद्र कुमावत, निलेश भामरे, आर डी भामरे, नितीन संचेती, निंबा पगार,  निलेश दुसाने, अविनाश पगार, प्रशांत वेढणे, कल्पना शिरोरे, संभाजी पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉक्टर विजय बिडकर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मगरे सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक शेखर जोशी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही यांनी केले तर आभार प्रदर्शन डांग सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा. हेमलताताई बिडकर यांनी मानले. यावेळी ताई साहेबांनी संस्थेला असणारी गरज सांगितली व आपल्याकडून वेळोवेळी आम्हाला अशीच मदत मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली व उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक श्री अहिरे सर व सर्व कर्मचारी, कन्या वस्तीगृहाच्या अधीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परेश देसाई यांनी केले.