अभोणा, ता. 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस हे प्रमुख उपस्थित होते. या वेळी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर श्री बोवा एस एस यांनी गाडगे महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
