जनता विद्यालय अभोणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
दि.२१जून (अभोणा)
जनता विद्यालय अभोणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक श्री .अहिरे आर एस. व श्री बागुल वाय. सी. यांनी योग दिना ची सुरुवात योग मंत्राने केली. त्यानंतर श्री .अहिरे आर एस. व श्री बागुल वाय. सी. यांच्या मार्गदर्शनातून योगा चे विविध प्रकार विद्यालयात घेण्यात आले. व त्या- त्या योग प्रकारा चे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री. बोवा सर यांनी प्राणायाम व अनुलोम- विलोम, भ्रमरा प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याचे शारिरिक व मानसिक दृष्टीने असणारे महत्त्व सांगितले.
यावेळी विद्यालयातील प्राचार्य श्री. बोवा सर, उपप्राचार्य श्री. जाधव डी.व्हि. , पर्यवेक्षक श्री अहिरे आर. एस. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
