डांग सेवा मंडळाचे संचालक श्री .अनिल पंडित यांचा विद्यालयातर्फे सत्कार
अभोना (दि.20/3/2026) जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथील मुख्य लिपिक श्री. अनिल पंडित यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन डांग सेवा मंडळाने 12 मार्च रोजी झालेल्या कर्मवीर दादासाहेब बिडकर अभिवादन सोहळा निमित्ताने 'आदर्श सेवक' या पुरस्काराने सन्मानित केले. त्याबद्दल विद्यालयातर्फे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बुवा सर यांच्या हस्ते अनिल पंडित यांचा सत्कार करण्यात आला. व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री. जाधव सर ,पर्यवेक्षक श्री. अहिरे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
