News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचे जयंती उत्साहात साजरी

जनता विद्यालय अभोणा येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचे जयंती उत्साहात साजरी
अभोणा, ता. 19- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे शिक्षणाची गंगोत्री आदिवासी भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारे, थोर स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी सेवक, नाशिक भूषण, दलितमित्र, माजी आमदार, आदिवासींचे उद्धारक, डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कर्मवीर दादासाहेब बिडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी श्री किरण सूर्यवंशी, श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री परेश देसाई, श्री शांताराम महाले, श्री चौधरी नरेंद्र, श्री योगेश बागुल, श्री तेजस कोठावदे, वसतिगृह अधीक्षक श्री आहिरे सर, चव्हाण मामा व वस्तीगृहातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना दादासाहेब बिडकर यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला.