News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

जनता विद्यालय अभोणा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
अभोणा,- ता. 19- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोना व आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अभोणा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री बुवा एस एस हे होते. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अभोणा येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेली होती त्यांना लेझीम पथकाच्या साह्याने व्यासपीठापर्यंत रॅली काढून आणण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या एकूण 55 विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला व प्रत्येक विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करावे असा संदेश दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बुवा एस एस यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, श्रीमती गायकवाड बी एस, श्रीमती जाधव पी के, श्री बागुल आर एम श्री शेवाळे एस एस यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती प्रियंका खैरनार यांनी केले.