नवोदय विद्यालयासाठी एका विद्यार्थ्यांची निवड
अभोणा- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथील कु. तन्मय योगेश पवार या विद्यार्थ्यांने इयत्ता 5 वीत झालेल्या नवोदय परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून नवोदय विद्यालय खेडगाव येथे निवड झाली. या विद्यार्थ्याला श्रीमती प्रियंका खैरनार, श्री कमलेश शेलार, श्रीमती कीर्ती गावित या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री अहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
