News Cover Image

कळवण तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात जनता विद्यालय अभोण्याचा प्रथम क्रमांक

कळवण तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात जनता विद्यालय अभोण्याचा प्रथम क्रमांक
अभोणा, दि. १७- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथील इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कुमारी तनुष्का शांताराम बोरसे  हिने कळवण तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तिची जिल्हास्तरावरील स्पर्धेत निवड झाली आहे.  या स्पर्धेचा विषय भारतीय ऊर्जा परिदृश्य 2047 संभावनाए हा होता. 
या विद्यार्थिनीला श्रीमती भदाणे एस ई, श्रीमती गांगुर्डे एस एस, श्रीमती गरुड एस के, श्री शिंदे डी ए, श्री मोराणकर सी एल, श्रीमती गांगुर्डे व्हि एस यांनी मार्गदर्शन केले तर यासाठी श्री चौधरी एन बी व श्री वांद्रे एन पी यांनी सहकार्य केले. 
या विजयी विद्यार्थिनीचे संस्थेच्या अध्यक्ष मा. ताईसाहेब, सचिव मा. मृणालताई जोशी, मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.