News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

अभोणा, दि. १५- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल अभोणा येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीयगीत, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत यांचे गायन करण्यात आले. त्यानंतर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण स्काऊट गाईड प्रमुख श्री आहिरे व्ही ए यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्काऊट गाईड प्रार्थना व गीत घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केले. नंतर कॉपी मुक्त अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. नंतर विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सुनिताताई पवार सरपंच, मीराताई पवार माजी सरपंच, राजेंद्र हिरे, उपाध्यक्ष शालेय समिती, शेखरबापू जोशी, देसाई गुरुजी, रवी आहेरराव, सुनील खैरनार, सोमनाथ सोनवणे, मनोज वेढणे, पद्मभूषण शहा, चेतन हिरे, भूषण वेढणे, नंदकुमार मराठे, मनोहर पाटील, देवा ठोके, पंकज जाधव, रत्नाकर वेढणे, मनोज सूर्यवंशी, दिगंबर मुसळे, राकेश दुसाने, दिलीप सूर्यवंशी, मनोज जाधव, कोठावदे सर प्राचार्य वरिष्ठ महाविद्यालय, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग, ग्रामपालिका सदस्य, विद्यालयाचे  मुख्याध्यापक बोवा एस एस
उपमुख्याध्यापक जाधव डी व्ही, पर्यवेक्षक अहिरे आर एस, आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य शेवाळे एस.एस., सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,  वसतिगृह अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुल वाय सी यांनी केले.