News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

जनता विद्यालय अभोणा येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

अभोणा, दि. १५ ऑक्टोबर : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची क्षितिजे विस्तारावीत आणि वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बोवा एस. एस., उपमुख्याध्यापक श्री. जाधव डी. व्ही. आणि पर्यवेक्षक श्री. आहिरे आर. एस. यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्याध्यापक श्री. बोवा एस. एस. व श्री. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तसेच वाचनाच्या महत्त्वाचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, पुस्तकांमधून ज्ञान मिळवावे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला. पुस्तकांशी मैत्री जोडून ज्ञानसमृद्ध होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.