जनता विद्यालय अभोणा येथे शाळा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला
अभोणा- ता. 15-
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे नवागतांचे स्वागत व शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम प्रवेश द्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यनिमित्ताने शाळेच्या प्रवेश द्वारावर व इमारतीला सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत यायला आनंद व उत्साह वाटेल हा यामागचा हेतू होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा. श्री राजेश हिरे, श्री राकेश दुसाने, सरपंच श्रीमती सुनिताताई पवार, श्री रत्नाकर वेढणे, श्री राहुल बोरसे, श्री कृष्णकुमार कामळस्कर, श्री न्हावकर साहेब, श्री के. के. पवार उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच आगार व्यवस्थापक श्री बोरसे साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पास चे वितरण करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम मुख्याध्यापक श्री बोवा एस. एस., उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही., पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. श्री महाले एस. वाय., यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री आहिरे व्ही. ए., श्रीमती गायकवाड बी एस, अधिक्षक श्री आहिरे सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना मिष्टांन्न भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.
