News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

जनता विद्यालय अभोणा येथे महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
अभोणा, ता. 14- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे महामानव, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. यावेळी सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. ही स्पर्धा सुबोध आण्णाजी गांगुर्डे युवा प्रतिष्ठान अभोणा यांच्या वतीने घेण्यात आली तसेच निबंध व चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र भेट देण्यात आले. 
विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर शिक्षकांचे मनोगत झाले. यात श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री योगेश बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. यात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. शेवटी श्री बोवा एस एस यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यात त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, श्रीमती गायकवाड बी एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका खैरनार यांनी केले.