जनता विद्यालय, अभोणाला अटल टिकरिंग प्रदर्शनात उज्ज्वल यश संपादन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय,अभोणा येथील विद्यार्थ्यांनी अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्प प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करत इलेक्ट्रॉनिक्स या विभागांत प्रथम क्रमांक पटकावला. हे प्रदर्शन 14 मार्च रोजी नाशिक येथे पार पडले असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी क्लस्टरमधील प्रकल्प सहभागी झाले होते.
“Empowering Teachers to Become ATL Transformation Agents” या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ३ सप्टेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत Mechanics, Electronics व Digital Literacy या विषयांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी जनता विद्यालय, अभोणा येथून श्री मोराणकर सी एल, श्री शिंदे डी ए, श्री जाधव ए वाय यांनी सहभाग घेतला होता.
या प्रकल्प प्रदर्शनात Electronics विभागात सोहम शिंदे व उत्कर्ष सोनवणे यांनी तयार केलेल्या उमेन सेफ्टी डिवाईस या उपकरणाचा प्रथम क्रमांक आला. या विद्यार्थ्यांना श्री शिंदे डी ए, श्री मोराणकर सी एल, श्री जाधव ए वाय, श्रीमती भदाणे एस ई व सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर, सचिव अॅड. मृणालताई जोशी व सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
