डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृतिदिन साजरा
जनता विद्यालय अभोना येथे डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी , दलित मित्र आदिवासी सेवक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री बोवा सर होते. बोवा सर यांच्या हस्ते दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयाचे उप मुख्याध्यापक श्री डी व्ही जाधव सर, आर. एम. बागुल सर उपशिक्षक श्री. वाय. सी. बागुल सर श्रीमती वर्षा गांगुर्डे ,श्रीमती अश्विनी बागुल यांनी आपल्या मनोगतातून दादासाहेब बिडकर यांचे जीवन कार्य व शैक्षणिक कार्य सांगितले . विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती प्रियंका खैरनार यांनी दादासाहेब बिडकर यांच्या जीवनावर आधारित कवितेचे आपल्या सुमधुर आवाजात गायन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा सर यांनी कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दादासाहेबांच्या अंगी असणारे विविध गुण विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .देसाई पी ए यांनी केले . आभार श्रीमती प्रियंका खैरनार यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय जाधव सर, पर्यवेक्षक माननीय अहिरे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
