News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जनता विद्यालय अभोणा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
अभोणा - ता. 11- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शुभांगी गांगुर्डे व मयुरी आहेर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, श्री बागुल वाय सी, श्रीमती खैरनार पी पी श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यात म. फुले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोवा एस एस यांनी म. फुले यांचे कार्य समाजासाठी किती प्रेरणादायी आहे ते स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस. गायकवाड बी एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले.