जनता विद्यालय अभोणा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी
अभोणा, ता. 10- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापक, शिक्षणाची ज्ञानगंगा महिलांपर्यंत पोहचवणाऱ्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
