जनता विद्यालय अभोणा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
अभोणा : डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. डी. व्ही. जाधव होते. यावेळी पर्यवेक्षक श्री. आर. एस. आहिरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व देशभक्तीच्या विचारांना उजाळा देण्यात आला. तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.
यावेळी श्री. ज्ञानेश्वर सोनवणे व श्री. योगेश बागुल यांनी मनोगत व्यक्त करून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थी मनोगतात आयुष शिंदे, ईश्वरी जाधव, हर्षदा कामळस्कर, प्रीती गावित, वैष्णवी बागुल व भाग्यश्री कवर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगतात उपमुख्याध्यापक श्री. डी. व्ही. जाधव यांनी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य व अहिंसेच्या विचारांचा तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री परेश देसाई यांनी केले
