News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.

जनता विद्यालय अभोणा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 1- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला तसेच 5 वी ते 9 वी व 11 वी चा निकाल जाहीर करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. यावेळी सर्वप्रथम वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहन करण्यात आले. नंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयात झालेल्या संस्थास्तरीय विजय सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले. नंतर 9 वी व 11 वी च्या प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी निकाल वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.