News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे आरोग्यदूत डॉ. विजयजी बिडकर यांची जयंती साजरी

जनता विद्यालय अभोणा येथे आरोग्यदूत डॉ. विजयजी बिडकर यांची जयंती साजरी
अभोणा, ता. 1- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव, आरोग्यदूत, दीनदुबळ्यांचे कैवारी, क्रीडाप्रेमी, निसर्ग प्रेमी, वाचनाचे व्यासंगी, स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा एस एस होते. या प्रसंगी सर्वप्रथम डॉ. साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. त्यात साक्षी खांडवी, अश्विनी जगताप, योगिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री योगेश बागुल, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. यांनी डॉ. साहेबांच्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोवा एस एस यांनी डॉ. साहेबांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. डॉ. साहेबांचा वाचनाचा व्यासंग सर्वांनी जोपासावा असा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, महाले एस वाय, श्रीमती गायकवाड बी एस, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या जयंतीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका खैरनार यांनी केले.