News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे पालक - शिक्षक सहविचार सभेचे आयोजन

जनता विद्यालय अभोणा येथे पालक - शिक्षक सहविचार सभेचे आयोजन
 अभोणा, ता. ३१- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे आज पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री सागर ए.एम. होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शेखरबापू जोशी, सरपंच श्रीमती सुनीताताई पवार, माजी सरपंच श्रीमती मीराबाई पवार, श्री राजेश अहिरे, श्री संजय पाटील, श्री राकेश दुसाने, श्री सुनील खैरनार, श्री सोनवणे साहेब हे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम कर्मवीर दादासाहेब बिडकर, विद्येची देवता सरस्वती,  संस्थेचे माजी सचिव डॉ विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व पालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस. सी. यांनी केले. त्यात त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्यानंतर श्री चौधरी ए. जी., श्री. बागुल आर. एम. श्री शिंदे सर, श्री देसाई पी.ए. यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर पालकांनी आपल्या काही समस्या मांडल्या तसेच शाळेविषयी व कामाविषयी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री सागर ए एम यांनी आपण दिलेल्या सूचनांचे नक्कीच पालन होईल असे आश्वासन दिले. तसेच पालकांचे सहकार्य आमच्यासाठी महत्वाचे आहे असेच सहकार्य आपण नेहमी आम्हाला करावे अशी विनंती केली.
     या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री अहिरे आर. एस. श्री किरण सूर्यवंशी, श्री. चंद्रकांत येवला, श्री. युवराज जाधव, श्रीमती जाधव मॅडम, श्री कमलेश शेलार  विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री अहिरे आर.एस. यांनी मानले.