जनता विद्यालय अभोणा, येथे किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न
अभोणा, ता. 28- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठाण नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किल्ले बनवणे स्पर्धा संपन्न झाली. यात 10 वी च्या विद्यार्थ्यांनी मल्हारगड तर 8 वी च्या विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ला तयार केला होता. या स्पर्धेचे ऑनलाईन परीक्षण करण्यात आले. याविद्यार्थ्यांना श्री आहिरे व्ही. ए., श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री कमलेश शेलार यांनी मार्गदर्शन केले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस. श्री बागुल वाय. सी. यांनी परिश्रम घेतले.
