क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 28- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मुर्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. नंतर मुख्याध्यापक श्री बोवा एस एस यांनी महात्मा फुले यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. सर्व शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
