जनता विद्यालय अभोणा येथे संविधान दिन उत्साहात साजरा
अभोणा ता. 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी कनिष्ठ महाविद्यालय विभागात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री बोवा एस. एस. यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.
दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. होते. यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची प्रत यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री बागुल आर. एम. व श्री देसाई पी. ए. यांनी संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. शेवटी उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. यांनी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व संविधान दिन याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
