जनता विद्यालय अभोणा येथे गणित दिवस साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती वर्षा गांगुर्डे यांनी गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
त्याचबरोबर काल झालेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी व्ही, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मार्गदर्शक सर्व विज्ञान शिक्षकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात सहभागी इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटत करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
