News Cover Image

भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा संपन्न

भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा संपन्न 
अभोणा- ता. 21- डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ नाशिक व गायत्री परिवार नाशिक यांच्या वतीने पुस्तक वाचनावर आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा आज आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 882 विद्यार्थी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बुवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पडली.