News Cover Image

जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज याची पुण्यतिथी उत्साहात साजरा

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज याची पुण्यतिथी उत्साहात साजरा
जनता विद्यालय अभोना येथे थोर समाज सुधारक , आधुनिक संत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री बोवा सर होते. बुवा सर यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाचे उपशिक्षक श्री. वाय. सी. बागुल सर यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे जीवन कार्य सांगितले . त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बोवा सर यांनी राष्ट्रसंत गाडगे यांच्या कार्याचा परिचय करून दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता करून गाडगे महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .देसाई पी ए यांनी केले .यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक माननीय जाधव सर, पर्यवेक्षक माननीय अहिरे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.