News Cover Image

जनता विद्यालय अभोणा येथे श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न

जनता विद्यालय अभोणा येथे श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न  
अभोणा, दि. १९- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे संस्थेच्या अध्यक्ष मा. हेमलताताई बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रावण क्वीन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री शेखर जोशी, मा. श्रीमती गौरी पाठक, मा. श्रीमती प्रीती राजपूत हे होते. यात सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती, कर्मवीर दादासाहेब बिडकर, डॉ. विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सागर ए एम यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थिनींनी सामूहिक रॅम्प वॉक केला. त्यानंतर स्पर्धकांनी वैयक्तीक सादरीकरण केले. यात एकूण २५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यात ताईसाहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वांनी वाचन वाढवावे, सामान्यज्ञान वाढवावे, आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यात श्रावण क्वीन ठरली. कुमारी आकांक्षा सचिन पवार 
द्वितीय- प्रतीक्षा अशोक गायकवाड, तृतीय- नंदिनी संदीप पाटील, 
उत्कृष्ट चालणे - सविता पोपट गांगुर्डे
उत्कृष्ट हास्य - रितिका राजेंद्र चव्हाण
उत्कृष्ट केशभूषा - दीपाली बाळू आव्हाड
उत्कृष्ट वेशभूषा - संस्कृती सुजीत पवार ह्या विद्यार्थिनी विजेत्या ठरल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री सागर ए एम पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, श्री किरण सूर्यवंशी,श्री. कमलेश शेलार, श्री अशोक जाधव, श्री योगेश बागुल, श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, श्रीमती जाधव प्रमिला, श्रीमती राजभोज मॅडम, श्री गवळी सतीश, श्री वांद्रे नितीन यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रमती प्रियंका खैरनार व श्रीमती भारती गायकवाड यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.