53 व्या कळवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनता विद्यालयाचा प्रथम क्रमांक
अभोणा, ता- 20- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथील विद्यार्थ्यांनी 53 व्या कळवण तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. यात कु. उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे व कु. सोहम अनिल शिंदे या विद्यार्थ्यांनी women safety diwies हे उपकरण तयार केले होते. या उपकरणाची निवड जिल्हा स्तरावर झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना दिंडोरी लोकसभा मतदार संघांचे खासदार मा. भास्करजी भगरे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष मा. ताईसाहेब, सचिव ऍड. मा. मृणालताई जोशी, मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही., पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री शिंदे डी ए, श्री मोराणकर सी एल, श्रीमती भदाणे एस ई, श्रीमती गावित के बी, श्रीमती गांगुर्डे व्ही एस यांनी मार्गदर्शन केले. तर कला शिक्षक श्री चौधरी एन बी व श्री वांद्रे एन पी यांचे सहकार्य लाभले.
