150 वर्षपूर्ती निमित्त वंदेमातरम गीत गायन कार्यक्रम संपन्न
अभोणा, दि. 7- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभोणा येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन घेण्यात आले. बकीमचंद्र चटर्जी लिखित या गीताला आज बरोबर 150 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सर्व शाळा महाविद्यालयात दि. 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत नियमित संपूर्ण वंदेमातरम गीत गायन घेण्यात यावे असा शासन आदेश प्राप्त झाला होता.त्यानुसार आमच्या विद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी आज विद्यालयचे मुख्याध्यापक श्री बोवा एस. एस., उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस. सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
