News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
अभोणा, दि. १५- डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे आज भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री सागर ए एम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर स्काऊट गाईड नेता श्री जाधव ए वाय यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केले. विद्यालयातील सर्व कार्यक्रम झाल्यावर अभोणा ग्रामपंचायत पर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली व तेथे ध्वजारोहण करण्यात आले. 
     यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक अभोणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, सरपंच, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक श्री सागर ए एम, उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी, पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस वसतिगृह अधीक्षक श्री सावकार सर, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बागुल वाय सी व पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस यांनी केले.