जनता विद्यालय अभोणा येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
अभोणा, ता. 15- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
