जनता विद्यालय अभोणा येथे शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न
अभोणा - ता. 13- साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक वाचनावर आधारित शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर होत्या. तर प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून श्रीमती निर्मल अष्टपुत्रे, श्री मिलिंद कुलकर्णी, श्री योगेश दशरथ, श्रीमती उज्ज्वला पेटकर, श्रीमती सुरेखा बोंडे, श्री सुभाष पाटील, श्री किरण समेळ, श्री सतीश मोहळे, श्रीमती अर्चना कुलकर्णी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुरेखा बोंडे यांनी केले. या स्पर्धेत संस्थेच्या सर्व विद्यालयातून एकूण 61 शिक्षकांनी सहभाग घेतला. यात प्राथमिक शिक्षक गट, माध्यमिक शिक्षक गट व उच्च माध्यमिक शिक्षक गट करण्यात आले होते. या स्पर्धेत गटानुसार विजेते पुढील प्रमाणे.
प्राथमिक गट
देविदास तुळशीराम गावित - प्रथम
गौरव रमाकांत बुवा - द्वितीय
हिरा विठ्ठल खंबाईत - तृतीय
माध्यमिक गट
जनार्दन हिरामण वाघमारे - प्रथम
नितीन बळवंत आहिरे - द्वितीय
दीपक शिवाजी आहिरे - तृतीय
सुरेखा चतरसिंग पवार - उत्तेजनार्थ
संदीप भालचंद्र कोळेकर - उत्तेजनार्थ
उच्चमाध्यमिक गट
महेंद्र अरुण सूर्यवंशी - प्रथम
केवळ जगन्नाथ वाघ - द्वितीय
संदीप सावळीराम मोरे - तृतीय
पूजा अशोक मोरे - उत्तेजनार्थ
या सर्व विजेत्या विजेत्यांना अनुक्रमे 1000, 900, व 800 रुपये व प्रमाणपत्र भेट देण्यात आले. तसेच जास्त स्पर्धक सहभागी शाळेला सन्मान चिन्ह व 1500/- किंमतीची पुस्तके भेट देण्यात आली. हे बक्षीस डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ शाळेला प्राप्त झाले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस, उपमुख्याध्यापक श्री जाधव डी. व्ही., पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, श्री महाले एस वाय यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परेश देसाई व श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. शेवटी आभार श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले.
