News Cover Image

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन - २०२५ अंतर्गत कळवण तालुकास्तरीय स्पर्धेत जनता विद्यालय अभोणा विद्यालयाला उज्ज्वल यश प्राप्त

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन - २०२५ अंतर्गत कळवण तालुकास्तरीय स्पर्धेत जनता विद्यालय अभोणा विद्यालयाला उज्ज्वल यश प्राप्त
अभोणा - ता.१२- अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत कळवण तालुकास्तरीय स्पर्धेत डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथील इयत्ता ९ वी चा विद्यार्थी कु. उत्कर्ष ज्ञानेश्वर सोनवणे द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. तसेच नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने हा विषय देण्यात आला होता. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेच्या अध्यक्ष माननीय ताईसाहेब, सचिव मा.ॲड. मृणालताई जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर ए एम, उपमुख्याध्यापक श्री धात्रक एस सी, पर्यवेक्षक श्री आहिरे एस आर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेत्या विद्यार्थ्याला विज्ञान शिक्षक श्रीमती भदाणे एस ई, श्री शिंदे डी ए, श्री मोराणकर सी एल यांनी मार्गदर्शन केले.