News Cover Image

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
अभोणा, ता. 12- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र मालेगाव येथून ए पी आय श्री शिवाजीराव तांबे साहेब, पी. एस आय दीपक आहिरे साहेब, पोलीस हवलदार श्री कैलास महाजन हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम कसे पाळावे, रस्त्यावरील पाट्या काय संदेश देतात. वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या साप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यात विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यात पुढील विद्यार्थी विजेते झाले. 
निबंध स्पर्धा
1) श्रद्धा गणपत बागुल- प्रथम 
2) मयुरी छबीलदास आहेर -द्वितीय 
3) कल्याणी दत्तू पवार - तृतीय 
चित्रकला स्पर्धा
1) यादवी नारायण पिंगळे - प्रथम 
2) स्वरूप शेखर महाले - द्वितीय 
3) केतकी एकनाथ बागुल - तृतीय 
याचवेळी विद्यार्थिनींना सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री बोवा एस एस पर्यवेक्षक श्री आहिरे आर एस, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वसतिगृह अधिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.