जनता विद्यालय अभोणा येथे व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धा संपन्न
अभोणा - ता. 22- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय अभोणा येथे साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांची संस्था स्तरीय व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष मा. हेमलताताई बिडकर होत्या तर प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून श्री. श्रीपाद कोतवाल, श्री सुभाष पाटील, श्रीमती सुरेखाताई बोन्डे, श्रीमती प्रीती यावलकर, श्रीमती वर्षा भंगाळे, श्रीमती अर्चना कुलकर्णी हे होते. या स्पर्धेसाठी 5 वी ते 9 वी असे पाच गट केले होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती अर्चना कुलकर्णी यांनी केले. नंतर स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. यात एकूण 25 विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. या कार्क्रमच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री बुवा एस. एस. उपमुख्याध्यापक श्री. जाधव डी. व्ही. पर्यवेक्षक श्री आहिरे आर. एस. यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षकांनाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या कार्क्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. तर आभार श्री बुवा एस एस यांनी मानले.
