News Cover Image

कट्टा चिमुकल्यांचा एक मुक्त संवाद कार्यक्रम संपन्न

कट्टा चिमुकल्यांचा एक मुक्त संवाद कार्यक्रम संपन्न
डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित  जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोणा व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कुल अभोणा यांच्या संयुक्त विद्यमाने डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर यांच्याशी मनमोकळया गप्पांचा कार्यक्रम  कट्टा चिमुकल्यांचा एक मुक्त संवाद हा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमात मा. ताईसाहेबांशी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांपासून ते माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्व विद्यार्थांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यात मा. ताईसाहेबांच्या जन्मापासून तर संपूर्ण कार्याचा अंतर्भाव होईल असे व आवडी- निवडी याविषयी जवळ जवळ 75 प्रश्न विचारले. यातून मा. ताईसाहेबांच्या कार्याला त्यांच्याच शब्दातून उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने प्रश्न विचारले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री अनिलकुमार सागर, श्री संजय शेवाळे, पर्यवेक्षक श्री राजेंद्र आहिरे श्री किरण सूर्यवंशी, इंग्लिश मिडियम च्या सर्व शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, जनता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योत्स्ना मोरे व श्रीमती स्वीटी सोनजे यांनी केले.